बातम्या
शेतजमिनीला नाव लावण्यासाठी केली होती लाचेची मागणी
By nisha patil - 2/13/2025 6:22:25 PM
Share This News:
पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या तक्रारदाराच्या पत्नीचे नाव शेत जमिनीला लावण्यासाठी लाचेची मागणी केल्या प्रकरणी मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे व त्याचे पंटर योगेश यशवंत गावडे आणि सुशांत सुभाष चौगुले या तिघांच्यावर लाचलुचपत पथकाने कारवाई केलीय.
तक्रारदार यांच्या वडीलाच्या नावे पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 10 गुंठे शेतजमीन असून ती जमीन तक्रादार यांच्या आईच्या नावाने बक्षीसपत्र केले होती. बक्षीसपत्र पन्हाळा येथील रजिस्टर कार्यालयात १० जानेवारीला दाखल केले होते. ११ जानेवारीला गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे येऊन सर्कल माळगे यांच्या साठी काम करीत असल्याचे सांगून बक्षीसपत्राची नोंद करण्यासाठी आमच्या कार्यालयात काम आल्याचे सांगितले.त्याची नोंद करण्यासाठी सर्कल माळगे आणि माझ्यासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागेल.असे म्हणून लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली.त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचून बुधवारी तक्रादाराकडून दोन हजारांची लाच घेताना गावडे यांला रंगेहात पकडून कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील,पोलिस निरीक्षक बापू सांळूखे ,पोहेकॉ सुनिल घोसाळकर ,सुनिल पाटील,संदिप पवार आणि चालक गजानन कुराडे यांनी केली
शेतजमिनीला नाव लावण्यासाठी केली होती लाचेची मागणी
|