बातम्या

भीमा कृषी प्रदर्शनाची दिमाखात सुरुवात.

Bhima Agriculture Exhibition begins in Dimakh


By nisha patil - 2/22/2025 12:49:35 PM
Share This News:



भीमा कृषी प्रदर्शनाची दिमाखात सुरुवात.

शेतकऱ्यांनी शेतीतील तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक – कृषी मंत्री माणिकराव कोकाटे.

 पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी व पशु प्रदर्शनाला शुक्रवारपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते फित कापून झालं. यावेळी माजी.आमदार महादेवराव महाडिक, खा. धनंजय महाडिक,खासदार धैर्यशील माने ,माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद सीईओ एस कार्तिकेयन, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान आयोजित समारंभा प्रसंगी बोलताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी  सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे हे आमच्या ध्यानात आहे.मात्र आता शेतीमध्ये विकासावर अधिक भर देणे शेतकऱ्यांनी आवश्यक आहे. त्यासाठी अशी प्रदर्शने महत्त्वपूर्ण असून नव नवीन तंत्रज्ञान उपयोग करून शेती कशी करावी यावर धोरणे राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले. 

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागतपर बोलताना गेली १७ वर्षापासून भीमा कृषी व पशु प्रदर्शन मधून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त शेती पूरक माहिती साधने विक्री व खरेदी करता येत आहेत.प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक संधी उपलब्ध झाली असून चार दिवसांमध्ये मोठी उलाढाल प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असते आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहावयास खरेदी करता येते असे सांगितले.

यावेळी ग्रामीण भागामध्ये  उत्कृष्टरित्या पशुवैद्यकीय सेवा व लंपी रोगाच्या प्रादुर्भावामध्ये चांगल्या रीतीने सेवा आणि पशुधन दुग्ध उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना भीमा गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक,आमदार अमल महाडिक,आमदार सुरेश हाळवणकर,माजी आमदार भरमु अण्णा पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस,कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक,  भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप महानगर कोल्हापूर विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा नाथाजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष भाजप राजवर्धन निंबाळकर, भाजप कोल्हापूर महानगर महिला जिल्हाध्यक्ष सौ.रूपाराणी निकम आदी उपस्थित होते.


भीमा कृषी प्रदर्शनाची दिमाखात सुरुवात.
Total Views: 33