विशेष बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
By nisha patil - 1/3/2025 8:44:15 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
कोल्हापूर : दूधगंगा, वारणा, राधानगरी, तुळशी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
बैठकीत धरणांमधील पाणीसाठा आणि उन्हाळ्यातील पाणीवाटपाचे नियोजन यावर चर्चा झाली. तसेच पाणीपुरवठा संस्थांना जुन्या दरानेच पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलरची सक्ती न करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
एमआयडीसीमार्फत गावांना घरगुती दराने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. या बैठकीला खासदार, आमदार, पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
|