बातम्या
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
By Administrator - 2/17/2025 4:34:30 PM
Share This News:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
कोल्हापूर,– उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा जिल्हा दौरा आगामी 17 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे असेल:
- दुपारी 1.45 वाजता: सांगली येथून वाहनाने कोल्हापूरकडे प्रयाण.
- दुपारी 2.50 वाजता: कोल्हापूर येथील संभाजीनगर, निवासस्थानी आगमन.
- दुपारी 4.15 वाजता: वाहनाने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.
- सायंकाळी 5 वाजता: रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळ येथे उपस्थिती.
- सायंकाळी 5.10 वाजता: कोल्हापूर विमानतळ येथून न्यु पॅलेसकडे प्रयाण.
- सायंकाळी 5.35 वाजता: न्यु पॅलेस येथे छत्रपती शाहु महाराज यांच्या भेटीसाठी आगमन.
- सायंकाळी 6.10 वाजता: डॉ. नुपूर पाटील यांच्या डर्मा लॅब स्किन क्लिनिक उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ: नवरंज हौसिंग सोसायटी, कलेक्टर ऑफीस रोड, ई वॉर्ड नागाळा पार्क).
- सायंकाळी 6.30 वाजता: वाहनाने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.
- सायंकाळी 6.50 वाजता: रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत आढावा बैठकीस उपस्थिती.
- रात्री 8.15 वाजता: कोल्हापूर निवासस्थान येथून वाहनाने कोल्हापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
- रात्री 8.55 वाजता: कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
यावेळी मंत्री पाटील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून, त्यांचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा
|