बातम्या
कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर कटिबद्ध
By nisha patil - 2/15/2025 7:45:52 PM
Share This News:
कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर कटिबद्ध
कोल्हापूर, दि. १५ – कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शिवसेना जिल्हा कार्यालयास भेट देऊन त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पालकमंत्री पदाच्या जबाबदारीबद्दल बोलताना आबिटकर यांनी सर्वांना सोबत घेऊन विकासाचे नवे व्हिजन तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षसंघटन मजबूत करून शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचेही आवाहन त्यांनी केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढ, तीर्थक्षेत्र विकास, पूरनियंत्रण प्रकल्प, आयटी पार्क, रिंग रोड, पार्किंग सुविधा आदींच्या माध्यमातून शहराचा विकास साध्य केला जाईल, असे सांगितले.
या कार्यक्रमास माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकासासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर कटिबद्ध
|