विशेष बातम्या

शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

Mahavitarans electricity bill payment center opens on Saturday


By nisha patil - 3/28/2025 9:29:12 PM
Share This News:



शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू

 कोल्हापूर/ सांगली, दि. 28 मार्च २०२५: मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि.29), रविवार (दि.30) व सोमवार (दि.31) रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 70 हजार 924 वीज ग्राहकांकडे 24 कोटी 20 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 24 हजार 883 वीज ग्राहकांकडे 12 कोटी 95 लाख आणि सांगली जिल्ह्यात 46 हजार 41 वीज ग्राहकांकडे 11 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.

वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशिल संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.


शनिवार, रविवार व सोमवार या सुट्टीच्या दिवशी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू
Total Views: 30