ग्रामीण
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक एग्रीच्या दोन विद्यार्थिनींची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
By nisha patil - 1/24/2025 7:40:35 PM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक एग्रीच्या दोन विद्यार्थिनींची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
तळसंदे, दि. २४ : डॉ. डी. वाय. पाटील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या 2017 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कु. ऋतुजा जाधव व कु. प्राजक्ता बडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे अन्न सुरक्षा अधिकारी पदावर यशस्वी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा बसला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सांगितले की, व्यावहारिक ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवता आले. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक एग्रीच्या दोन विद्यार्थिनींची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर निवड
|