ताज्या बातम्या
वारणा पट्ट्यातील विजय पावलेची चमकदार कामगिरी
By nisha patil - 3/22/2025 1:09:09 PM
Share This News:
वारणा पट्ट्यातील विजय पावलेची चमकदार कामगिरी
आयएसपीएलमध्ये ‘माझी मुंबई’ संघाचा कर्णधार म्हणून चमक
मांगले (ता. शिराळा) येथील क्रिकेटपटू विजय जयसिंग पावले याने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) स्पर्धेत सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या 'माझी मुंबई' संघाचे नेतृत्व करताना उत्कृष्ट कामगिरी केली. या यशस्वी खेळासाठी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी विजय पावले यांचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्य कुटुंबातील विजयने मिळवलेले यश कौतुकास्पद असून, भविष्यातही तो संधीचे सोने करेल आणि वारणा परिसराचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्यास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदूरकर (आप्पा), वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील (आबा) आदी मान्यवर उपस्थित होते.
वारणा पट्ट्यातील विजय पावलेची चमकदार कामगिरी
|