बातम्या

बेरोजगारीची आकडेवारी विकासकामांच्या पुस्तकातून का जाहीर केली नाही ?

Why is the unemployment statistics not announced from the book of development works


By nisha patil - 5/11/2024 9:38:37 PM
Share This News:



बेरोजगारीची आकडेवारी विकासकामांच्या पुस्तकातून का जाहीर केली नाही ? 
 

राजे समरजितसिंह घाटगे यांचा पालकमंत्री मुश्रीफ यांना सवाल......

 सावर्डे बुद्रुक / प्रतिनिधी गेल्या पंचवीस वर्षांत एकही नवीन उद्योग-व्यवसाय मतदारसंघात पालकमंत्र्यांनी मतदारसंघात आणलेला नाही.त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे.परिणामी स्थानिक भुमिपुत्रांना रोजीरोटीसाठी तालुक्याच्या बाहेरगावी जावे लागत आहे. खरंतर ही शाहूंच्या भूमीची शौकांतीकाच म्हणावी लागेल.त्यामुळे वारंवार टिमकी वाजवत असलेल्या विकासकामांच्या पुस्तकातून मतदारसंघात वाढलेल्या बेकारीची आकडेवारी पालक मंत्र्यांनी  का जाहीर केली नाही? असा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.सावर्डे खुर्द (ता.कागल) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

घाटगे पुढे  म्हणाले,पालकमंत्री सात हजार कोटींचा निधी आणला म्हणतात, मग या निधीतून त्यांनी तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी किती आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे मंजूर करून आणली , अस्तित्वात असलेल्या पीसी सेंटरमध्ये किती आधुनिक सुविधा दिल्या.ते एकदा जाहीर करावे.आजही ग्रामीण भागातील जनतेला किरकोळ उपचारांसाठी देखील तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते हाच का पालकमंत्र्यांचा विकास म्हणायचा? असा सवाल उपस्थित करून आपला लोकसेवक म्हणून काम करण्याची आम्हाला संधी द्या आपल्याला  आरोग्याच्या मूलभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी म्हणाले, देशाचे नेते शरद पवार यांनी पंचवीस वर्षे कागलच्या गैबी चौकात येऊन ज्यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेऊन आमदार,मंत्री केले. त्यांचाच विश्वासघात करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे जनतेने आता सावध होऊन राजे समरजितसिंह घाटगे यांना विक्रमी मताने निवडून द्यावे असे आवाहन केले.
       आनंदा ज्ञानू डाफळे, आकाश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
       

यावेळी शाहू कारखान्याचे संचालक डी.एस. पाटील,प्रताप पाटील,दिगंबर आस्वले, एल.डी. पाटील,चंद्रकांत दंडवते, ज्योतीराम मालवेकर, बचाराम पसारे ,यशवंत मालवेकर, शिवाजी विष्णू डाफळे,भिकाजी कदम, बाळासो लिंगडे यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
स्वागत प्रास्ताविक माजी उपसरपंच हिंदुराव मालवेकर यांनी केले.गणेश मालवेकर यांनी आभार मानले..

कंत्राटदारांचा विकास हाच पालकमंत्र्यांचा अजेंडा....... 
 

प्रास्ताविक करताना माझी उपसरपंच हिंदुराव मालवेकर म्हणाले, गेली पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या पालकमंत्र्यांनी या परिसरात कोणत्याही मुलभूत सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत.त्यामुळे येथील जनतेची त्यांच्याकडून अक्षरशः घोर फसवणूक झालेली आहे.केवळ कंत्राटदारांचा विकास म्हणजे जनतेचा विकास हाच पालकमंत्र्यांच्या कारभाराचा अजेंडा आहे. त्यामुळे जनता आता सावध झालेली असून त्यांना निवडून देण्याची चुक जनता पुन्हा करणार नाही...
  


बेरोजगारीची आकडेवारी विकासकामांच्या पुस्तकातून का जाहीर केली नाही ?