विशेष बातम्या
आ. अमल महाडिक यांची आयुक्तांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा..
By nisha patil - 2/15/2025 2:59:18 PM
Share This News:
आ. अमल महाडिक यांनी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत गाळेधारकांची भाडेवाढ, व्यवसाय परवाना, अग्निशमन कर, टिंबर मार्केटचे प्रॉपर्टी कार्ड, दुहेरी परवाना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
व्यापाऱ्यांच्या परवाना शुल्काबाबत सर्वेक्षण करून दुरुस्ती केली जाईल, असे प्रशासकांनी स्पष्ट केले. २७ फेब्रुवारीला या विषयावर पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, चेंबर अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव अजित कोठारी, संचालक संपत पाटील, राकेश मगदूम उपस्थित होते.
आ. अमल महाडिक यांची आयुक्तांसोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा..
|