बातम्या
दाम दुप्पट वीज दरवाढ विरोधात निवेदन
By nisha patil - 11/24/2023 5:07:14 PM
Share This News:
पिठाची गिरणी मालक ,चालक हे समाजाची सेवा करतात ते सामान्य लोकांना लोकांना दैनंदिन आहारात लागणारे पीठ दळून द्यावयाचे काम करतात कर्नाटकात मे महिन्यानंतर अचानक गिरणी चालकांचा ग्राहक मीटरचा स्थायी दर यात वाढ केली तसेच युनिटचे दर देखील दुप्पट ते चौपट केली हि अचानक झालेली दरवाढ हि अन्यायी आहे ती माफ झालीच पाहिजे ,सामान्य नागरिकांना दरवाढीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
,वाढीव वीजदरामुळे सर्वसामान्यांचे खर्चाचे बजेट कोलमडले आहे,झालेली,तसेच पिठाची गिरणी चालकांना देखील भरमसाठ दरवाढची बिले येत आहेत त्यामुळे त्यांचा व्यवसाय मोडकळीस आला आहे ,हि अन्यायी दरवाढ पाठीमागे घ्यावी यासाठी निपाणी तालुका पिठाची गिरणी मालक चालक अभिवृद्धी संघ, हंचीनाल यांच्या वतीने ,वाढीव दाम दुप्पट वीज दरवाढ विरोधात आमदार शशिकला जोल्ले वहिनी, तसेच kAB अक्षय सर आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी वाढीव दाम दुप्पट वीज दर माफ करावी तसेच आमच्या विविध मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, आमच्या मागन्या मान्य करून आम्हला न्याय मिळावा असे निवेदन पिठाची गिरणी चालक मालक संघटना यांच्या वतीने करण्यात आले
यावेळी,हांचीनाल येथील पीठ मालक चालक संघटनेचे अध्यक्ष अरुण चौगुले,उपाध्यक्ष संजय खोत, सेक्रेटरी सोमनाथ शिंदे कुर्ली ,
शिवाजी पूनेकर, बाळासाहेब चीमगावे,पोपत राऊत, गुरू ढगे,जितू खिचडे,विकास पुणेकर,बापू साबळे,रावसाहेब कुंभार,शिवाजी पोवार उपस्थित होते
दाम दुप्पट वीज दरवाढ विरोधात निवेदन
|