ताज्या बातम्या

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गटांसाठी कार्यशाळांचे आयोजन

RBI organizes workshops for self


By nisha patil - 8/13/2024 7:26:55 PM
Share This News:



देशामध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशा फसवणूक प्रकारांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या संकल्पनेतून आर्थिक साक्षरता होण्यासाठी आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गट महिलांसाठी नुकतेच कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यशाळांमध्ये फसवणुकीसाठी वापरले जाणारे वेगवेगळे प्रकार, Artificial Intelligence(AI) चा उपयोग करुन व्हिडियो कॉलद्वारे केली जाणारी फसवणूक, क्रेडिट कार्ड फसवणूक, एटीएम, UPI व्यवहार फसवणूक, चलन, नोटा बदलची माहिती- फाटलेल्या किंवा खराब नोट कशा प्रकारे बदलून घ्याव्यात, बनावट नोटा कशा ओळखाव्यात, बनावट नोटा मिळाल्या तर त्याचे काय करावे, विविध सरकारी योजना इ. बद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी विशाल गोंदके, प्रबंधक, वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई विभाग, शेखर जाधव, गट विकास अधिकारी, भुदरगड, मधुकेश राम भारतीय रिझर्व्ह बँक, रोमानी रहंगडले, भारतीय रिझर्व्ह बँक, आशुतोष जाधव, जिल्हा विकास व्यवस्थापक, NABARD व श्री गणेश गोडसे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, कोल्हापुर यांनी मार्गदर्शन केले.

 कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे अग्रणी जिल्हा अधिकारी श्री. गोंदके म्हणाले, या कार्यशाळेचा तुम्ही चांगला उपयोग करुन घ्या. जिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, इतर  नागरिकांपर्यंत आर्थिक जनजागृती व इतर माहिती पोहोचवावी.

 

जे विकते ते बनवा म्हणजे महिलांनी पारंपरिक व्यवसायापलीकडे जाऊन ज्या गोष्टी सध्या बाजारामध्ये विकल्या जातात अशा गोष्टींचे व्यवसाय महिलांनी सुरु केले पाहिजेत, असे आवाहन गट विकास अधिकारी श्री. जाधव यांनी केले.

 बचत गटांची सुरुवात कुठून झाली, त्याची व्याप्ती कशाप्रकारे झाली तसेच बचत गट संकल्पना उभारणी मध्ये नाबार्ड ने कोणत्या प्रकारे योगदान दिले या बद्दल नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले.

 बचत गटांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. बँका अतिशय सकारात्मक आणि जलद गतीने बचत गटांना कर्ज पुरवठा करत आहेत. तसेच कोणत्याही अमिषाला बळी न पडता सतर्क राहून आर्थिक व्यवहार करावेत म्हणजे आपली फसवणूक होणार नाही, असे आवाहन श्री. गोडसे यांनी केले. या कार्यशाळेमुळे महिलांना आर्थिक साक्षर होण्यासाठी, त्यांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. गणेश गोडसे यांनी व्यक्त केला.

 

यावेळी उपस्थित बचत गटातील महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे महिलांना खूप फायदा झाला तसेच त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया, उमेदचे आभार मानले.

 


भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गटांसाठी कार्यशाळांचे आयोजन