ताज्या बातम्या

विश्वशांती साठी जगभरात नवकार महामंत्र दिवस आयोजन

Navkar Mahamantra Day organized worldwide for world peace


By nisha patil - 5/4/2025 10:25:37 PM
Share This News:



विश्वशांती साठी जगभरात नवकार महामंत्र दिवस आयोजन

कोल्हापूर जिल्हयातील बारा तालुक्यात आयोजन जीतो समन्वयाने विविध संस्था सहभागी

भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून "जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ध्या वतीने जगभरामध्ये 108 देशांमध्ये व भारतामध्ये 6000 ठिकाणी नवकार महामंत्र अपन कार्यक्रम आयोजित केला आहे. संपूर्ण जगामध्ये युद्ध संघर्ष, आतंकवाद, दुराचार, हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापीत व्हावी व सुख-शांती आनंद पसरावा या उद्देशाने "जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन- जितो अपेक्स या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज कोठारी यांनी हा संकल्प केला आहे. या कार्यक्रमांमध्ये एक कोटी आठ लाख लोक सहभागी होतील असा संकल्प जीतो संघटनेच्या वतीने केला आहे.

जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तीशाली मंत्र मानला जातो.या मंत्राद्‌वारे सामूहिक मंत्र पठण केल्याने एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख-शांती नांदेल या आवनेने संपूर्ण जगात 9 एप्रिल रोजी एकाच वेळी सकाळी 7:30 ते 9 या वेळेमध्ये नवकार महामंत्र पठण होणार आहे. भव्य आणि दिव्य अशा कार्यक्रमाचे उ‌द्घाटन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 एप्रिल रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये जैन समाजाबरोबर इतर समाजही सामील होणार आहेत.


विश्वशांती साठी जगभरात नवकार महामंत्र दिवस आयोजन
Total Views: 59