ताज्या बातम्या
मनसेचा खाजगी ठेकेदारांच्या मनमानीविरोधात एल्गार..
By nisha patil - 3/18/2025 5:51:16 PM
Share This News:
मनसेचा खाजगी ठेकेदारांच्या मनमानीविरोधात एल्गार..
खाजगी ठेकेदारांच्या अन्यायाविरोधात मनसेचा लढा –
बसचालकांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने खाजगी ठेकेदारांच्या मनमानीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मनसेच्या नेत्यांनी जिल्हा परिवहन अधिकारी (डीसी) शिवाजीराव जाधव यांना निवेदन देऊन खाजगी बसचालकांना होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीचा मुद्दा उपस्थित केला.
बसचालकांना होत असलेला त्रास:
जॉईनिंग लेटर नाही, पगार स्लिप मिळत नाही.
आठवड्याची सुट्टी पगारी द्यावी अशी मागणी.
४०० किमीऐवजी ६०० किमी रनिंग, १६-१८ तास ड्युटीचा अन्याय.
पीएफ, बोनस, विमा व मेडिकल सुविधा मिळत नाहीत.
खाजगी मॅनेजमेंटकडून उध्दट वागणूक.
जर तातडीने खाजगी ठेकेदारांच्या मनमानीला आळा घालण्यात आला नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजू जयसिंगराव जाधव यांनी दिला. या वेळी संजय नाईक, राहुल कुंभार, दीपक पाटील, प्रसाद सुतार, किरण बिलुगडे, सागर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने बसचालक उपस्थित होते.
मनसेचा खाजगी ठेकेदारांच्या मनमानीविरोधात एल्गार..
|