ताज्या बातम्या
शेंडा पार्कमध्ये पुन्हा आग!
By nisha patil - 3/13/2025 4:40:53 PM
Share This News:
शेंडा पार्कमध्ये पुन्हा आग!
कचऱ्याला लागलेल्या आगीने घेतला मोठा पेट...
महानगरपालिकेच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
शेंडा पार्क येथील कुष्ठधामच्या इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा शेंडा पार्कपासून आर.के. नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याला अचानक आग लागली (किंवा लावली गेली). आगीचा मोठा भडका उडण्याआधीच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून तातडीने आग आटोक्यात आणली.
या वेळी आगीमुळे बाजूलाच असलेल्या कृषी महाविद्यालयातील शेकडो झाडांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. सतत लागणाऱ्या या आगींमुळे शेंडा पार्कमध्ये नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
शेंडा पार्कमध्ये पुन्हा आग!
|