ताज्या बातम्या

कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा धोका; प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Thunderstorms and lightning in Kolhapur


By nisha patil - 3/17/2025 4:57:51 PM
Share This News:



ब्रेकिंग न्यूज | कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जोरदार वारे आणि विजांच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. उघड्या जागेत जाणे टाळा, झाडांखाली थांबू नका, तसेच विजेच्या खांबांपासून दूर राहा. गरज असल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक माहितीसाठी 'Taara News' सोबत रहा.
 


कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा धोका
Total Views: 190