शैक्षणिक
आदर्श गुरुकुलच्या या उपक्रमाचे मिणचेकरांकडून भरभरून कौतुक..
By nisha patil - 1/25/2025 1:35:55 PM
Share This News:
संविधान वाचन सप्ताहाला मा.आ. मिणचेकर यांची भेट...
आदर्श गुरुकुलच्या या उपक्रमाचे मिणचेकरांकडून भरभरून कौतुक..
आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव यांच्या अमृत महोत्सव निमित्त संविधान वाचन सप्ताह कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमास मा. आमदार डॉ.सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ ,कोल्हापूर) यांनी भेट देऊन संविधान वाचनात सहभाग घेतला.
आदर्श गुरुकुल स्कूल व जुनिअर कॉलेज येथे सुरू असलेल्या संविधान वाचन सप्ताहाला माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी भेट दिली.आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक डी एस घुगरे सर यांनी सामूहिक संविधान वाचन हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये तब्बल ११११ इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या संविधान वाचनाच्या माध्यमातून या सर्व मुलांना भारतीय संविधानाचे महत्व येणाऱ्या काळात अत्यंत आवश्यक असून त्याचे वाचन बालवयापासूनच होणे आवश्यक आहे तसेच आपल्या शाळेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळेचे व आयोजकांचे कौतुक यावेळी मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. अशा प्रकारचे उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवणे ही काळाची गरज बनली आहे असेही म्हणाले.
यावेळी मा. अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव, पवार मॅडम,घुगरे सर, घुगरे मॅडम, शाळेतील शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आदर्श गुरुकुलच्या या उपक्रमाचे मिणचेकरांकडून भरभरून कौतुक..
|