सावर्डे गावासाठी 1 कोटी 37 लाखाची विकास कामे

1 Crore 37 Lakh development works for Sawarde village


By nisha patil - 1/6/2023 7:13:45 AM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) सावर्डे गावातील विविध जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. भविष्यात देखील आणखी चांगली कामे करण्याची ग्वाही सावर्डेकरांना दिली. येथील मुख्य रस्ता ते प्राथमिक आरोग्य केंद्र,मांतग समाज मंदिर संरक्षक भिंत,काँक्रिट रस्ता आदी कामाचा शुभारंभ आमदार राजू बाबा आवळे यांच्या हस्ते  करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव पाटील होते. प्रास्ताविक सरपंच अमोल कांबळे आमदार आवळे यांच्या प्रयत्नाने सावर्डे गावासाठी एक कोटी 37 लाखाची विकास कामे झाल्याचे नमूद करत याबद्दल सावर्डे ग्रामस्थासह आम्ही आमदारांचे ऋणी आहोत. केलेल्या विकास कामाची उतराई आमदार आवळे यांच्या  पाठीशी राहण्याची करण्याची ग्वाही सरपंच कांबळे यांनी दिली.
    यावेळी बबनराव पाटील, प्रा. राम कांबळे,माजी सरपंच शिवाजीराव शेळके ,उपसरपंच अजित पाटील, शिवाजीराव भोसले, नागेश नरंदेकर, मानसिंग चव्हाण, कलंदर मकानदार, नितीन चव्हाण,चेतन चव्हाण, बाळासाहेब खाडे, संजय चव्हाण, तानाजी पाटील, भास्कर चव्हाण, सुदाम इंगवले, भास्कर चव्हाण, बजरंग लुगडे, आमीरशहा मुल्ला, बाबासो सुर्वे,डी जी कांबळे, विकास लोंढे, शशिकांत मोहिते ,कुमार कांबळे, सचिन  कांबळे, गणेश कुरणे आदी उपस्थित होते.


सावर्डे गावासाठी 1 कोटी 37 लाखाची विकास कामे