बातम्या

हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

10 crores sanctioned for installation of high mast lights


By nisha patil - 7/27/2023 6:20:16 PM
Share This News:



महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत राज्य शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेला सोलर हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील अध्यादेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले असून त्या दृष्टीने नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून विविध योजना अंतर्गत इचलकरंजी महापालिकेला निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आ. प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. महापालिका हद्दीतील विविध आवश्यक भागात तसेच मुख्य चौकात सोलार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी निधी संदर्भात शासनाकडे आवाडे यांनी पत्रव्यवहार केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना इचलकरंजी महानगरपालिकेला सोलार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.


हायमास्ट दिवे बसविण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर