बातम्या

एसटीच्या तिकीट दरात उद्यापासून दहा टक्के वाढ

10 percent increase in ST ticket price from tomorrow


By nisha patil - 7/11/2023 9:24:05 PM
Share This News:



दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ दरवर्षीप्रमाणे दहा टक्के तिकीट दरात हंगामी वाढ करते त्यानंतर पुन्हा केलेली भाडेवार रद्द करते यंदा त्याचप्रमाणे वाढ करण्यात आली आहे

दिवाळीच्या तोंडावर खाजगी वाहन चालकांकडून भाडे वाढ केली आहे त्यातच आता एसटी महामंडळाने देखील आठ ते 29 नोव्हेंबर दरम्यान दहा टक्क्यांनी भाडे वाढ केली आहे त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भूर्दड बसणार आहे दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यासाठी उद्या बुधवारपासून मंडळाकडून पुणे मार्गावर 220 जादा बसेसची सोय केली आहे दिवाळीनंतर परतीच्या वाहतुकीचे ही नियोजन करण्यात आले आहे या फेऱ्या ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत दिवाळीसह भाऊबीज सणासाठी प्रवासी गतीनुसार जिल्हाअंतर्गत ग्रामीण मार्गावर जादा वाहतूक केली जाणार आहे राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून मुंबई पुणे बीड परभणी अक्कलकोट तुळजापूर बंगळूरु अशा विविध मार्गावर जादा वाहतूक केली जाणार आहे


एसटीच्या तिकीट दरात उद्यापासून दहा टक्के वाढ