बातम्या

आझाद मैदानवर कोल्हापुरातील १० हजार शिवसैनिक

10 thousand Shiv Sainiks from Kolhapur on Azad Maidan


By nisha patil - 10/23/2023 4:27:34 PM
Share This News:



आझाद मैदानवर कोल्हापुरातील १० हजार शिवसैनिक 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कोल्हापुरातील १० हजार शिवसैनिक लावणार उपस्थिती.. 

कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील आझाद मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी केले.  शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील आझाद मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनासंदर्भात  कोल्हापूर जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे पार पडली. 

  या बैठकीत प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर बोलत होते. यावेळी   शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणाऱ्या तळागाळातील शिवसैनिकांनी शिवसेना जिवंत ठेवली. प्रंसगी गुन्हे अंगावर घेवून आयुष्यभर कॉंग्रेसला विरोध केला पण, तीच शिवसेना कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या विचारांवर चालू लागली आणि कडवट शिवसैनिकांना पदोपदी होणारा अवमान सहन न झाल्यानेच शिवसेनेत उठाव झाला. या उठावाचे सूत्रधार मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आंनद दिघे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करत असून, टीकेला उत्तर न देता महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून महाराष्ट्र राज्याच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून शिवसेना काम करत आहे. असे ते म्हणाले.

आगामी काळात महाराष्ट्र राज्याची उन्नती आणि सर्वांगीण विकास हेच धोरण शिवसेनेचं असून, बाळासाहेब ठाकरे यांच्या  विचारांचा खरा वारसा जपणारे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील आझाद मैदानवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे  ही त्यांनी सांगितले 
   
या बैठकीस   नगरसेवक नंदकुमार मोरे,.नगरसेवक राजू हुंबे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, उदय भोसले, प्रा.शिवाजीराव पाटील, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, समन्वयक पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, युवतीसेना शहर अधिकारी नम्रता भोसले, युवासेनेचे प्रसाद चव्हाण, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश पोवार, समन्वयक विक्रम पोवार, शहरप्रमुख राजू पोवार, शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

 


आझाद मैदानवर कोल्हापुरातील १० हजार शिवसैनिक