बातम्या

अवघ्या 24 तासात सोने दरात 1000 रुपयांची वाढ, 

1000 rupees increase in gold price in just 24 hours,


By surekha -
Share This News:



अवघ्या 24 तासात सोने दरात 1000 रुपयांची वाढ, 

 देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन लगीन सराईत सोन्याच्या दराने नवा उच्चांक  गाठला आहे.   जळगावात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची मोठी वाढ झाल्याने सोन्याचे दर पुन्हा एकदा 63500  रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.  गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहे.  आज देखील पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन सोन्याचे दर हे 61900 तर जीएसटीसह 63500 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक पातळीवर बँकाच्या व्याज दरात सातत्याने होत असलेलं बदल यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार हे सोन्याकडे  वळू लागल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे.  त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे  सोने व्यावसायिक सांगत आहेत.


1000 rupees increase in gold price in just 24 hours,