बातम्या
108 विद्यासागरजी महाराजांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाचे आयोजन
By nisha patil - 7/2/2025 1:02:16 PM
Share This News:
जयसिंगपूरमधील पाटील मळा येथे आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
यावेळी आ.राहुल आवाडेंनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या महान कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा प्रसार आणि समाजातील आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांच्या शिकवणींची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. महामहोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरालाही भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.
त्यांनी समाजसेवेच्या या पवित्र कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ.राहुल आवाडेंनी केले. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते आणि भाविकांनी भक्तिपूर्ण वातावरणात महामहोत्सवाचा लाभ घेतला.
108 विद्यासागरजी महाराजांच्या प्रथम समाधी स्मृती महामहोत्सवाचे आयोजन
|