बातम्या

मंत्रिमंडळाची बैठकीत ११ मंत्र्यांची दांडी; नेमकं कारण काय?

11 Ministers stake in Cabinet meeting


By nisha patil - 11/17/2023 7:47:55 PM
Share This News:



राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. पण या बैठकीला अर्धा डझन मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दिवाळीसाठी मतदारसंघात गेलेले मंत्री परत माघारीच आले नाहीत. त्याचा परिणाम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर झाला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्री कॅबिनेटची बैठक घेतली होती. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर 11 मंत्र्यांनी दांडी मारली आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे मंत्री अजूनही मंत्रालयाकडे आले नाहीत. त्यामुळेच ते बैठकीला आले नसल्याचं सांगितलं जात आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला 18 मंत्री उपस्थित असून 11 मंत्र्यांनी दांडी मारली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे जालन्यात ओबीसी रॅलीला उपस्थित आहेत. त्यामुळे ते कॅबिनेटच्या बैठकीला येऊ शकले नाहीत. तर इतर मंत्री दिवाळी निमित्ताने अजूनही आपल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे त्यांनाही बैठकीला येता आलं नाही
    आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात दुष्काळाचा तिसरा टप्पा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची 29 नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुके मोठ्यासंख्येने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेट समोर सादर केला जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकी आधी अजित पवारांनी सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.


मंत्रिमंडळाची बैठकीत ११ मंत्र्यांची दांडी; नेमकं कारण काय?