बातम्या
जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चाटे शिक्षण समूहाचे अकरावी विद्यार्थी यशस्वी
By nisha patil - 6/19/2023 1:10:25 PM
Share This News:
कोल्हापूर आयटीआय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील जेईई ॲडव्हान्स 2023 या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला या निकालावरून आयटीआय आयझर सोबतच पेट्रोलियम अँड एनर्जी स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेट्रोलियम टेक्नॉलॉजी यासारख्या विविध पदासाठीचे प्रवेश निश्चित होतात.
चाटे शिक्षण समूहाच्या ज्युनिअर कॉलेज क्लासेस आयटीआय नीट सेंटर चा कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी निकालाची उज्वल यशाची परंपरा जेईई परीक्षेतही कायम राखली आहे या प्रवेश परीक्षेत समूहाच्या एकूण 11 विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा पात्र करून आपला आयटीआयतील प्रवेश पक्का केला आहे या परीक्षेसाठी राबविण्यात आलेल्या चाटे पॅटर्नचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे गुणवंत विद्यार्थ्यांनी सांगितले भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चाटे शिक्षण समूहाचे विद्यार्थी कटिबंध राहतील अशी ग्वाही चाटे समूहाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे यांनी दिली .
जेईई 2023 च्या परीक्षेत यशस्वी होऊन देशपातळीवरील विविध आयटीआय मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी झालेले चाटे शिक्षण समूहाचे विशेष गुणवंत विद्यार्थी मोहन येवले आशिष पाटील संकेत शिंदे अथर्व साळोखे रोहन मोरबाळे अनिकेत कांबळे माही कल्याणकर सिद्धी देसाई आरती आंबेकर अनुज कोरे विशाखा प्रज्ञासागर अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
सर्व यशस्वींतांना चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र चाटे व प्राध्यापक गोपीचंद चाटे संचालक कॉलेजचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक शाखा संस्थापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चाटे शिक्षण समूहाचे अकरावी विद्यार्थी यशस्वी
|