बातम्या

कोल्हापूरात १२ तास लाठीकाठीचा उपक्रम..

12 hours Lathi Kathi activity in Kolhapur


By nisha patil - 5/15/2024 5:55:37 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूरात शिवजयंती, दसरा महोत्सव, गणेशोत्सव, छत्रपती संभाजी महाराज जयंती आदी धुमधडाक्यात साजरी करण्यात येत असते...  येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध घटनांचे सादरीकरण करण्यात आले होते.
 

दक्ष व संपत पाटील या पितापुत्रांनी १२ तास लाठीकाठी चालवली कोल्हापूर : येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्याच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील विविध घटनांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये लक्षवेधी ठरले ते सलग १२ तास लाठीकाठी फिरवण्याचा उपक्रम. पापाची तिकटी परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समितीच्या वतीने आज जयंती कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये पहाटेपासून लाठीकाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक
 

सैनिकाचे गाव गिरगाव येथील भैरवनाथ तालमीचे मल्ल संपत दत्तात्रय पाटील यांनी ८ वर्षांचा मुलगा दक्ष त्याच्यासोबत सलग १२ तास लाठीकाठी फिरवत मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवले. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.


कोल्हापूरात १२ तास लाठीकाठीचा उपक्रम..