बातम्या

मटका किंग विजय पाटील सह “मटकाकिंग गँगचे” 12 जण जिल्ह्यातून हद्दपार- एक वर्षासाठी जिल्हा पोलिस दलाची कारवाई

12 people of Matka King Gang


By nisha patil - 12/4/2024 9:06:00 AM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी, कोल्हापूर शहर परिसरातील “मटका किंग” गँग या सराईत संघटीत गुन्हेगारी टोळीचा, टोळी प्रमुखासह १२ इसमांना एक वर्षा करीता
कोल्हापूर जिल्हयातुन केले हद्दपार

 

कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळयावर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करणे बाबतकोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.
कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये अवैध दखलपात्र स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा-या ” मटका किंग गँग ” या नावाने कुख्यात असले टोळीचा टोळी प्रमुख १) १) विजय लहु पाटील, रा.विजय प्लाझा देवकर पानंद कोल्हापूर, टोळीचे सक्रिय सदस्य २) राहुल बाळु गायकवाड, रा. यादवनगर राजारामपुरी कोल्हापूर, ३) अजित सर्जेराव इंगळे, रा. टिंबर मार्केट कोल्हापूर, ४) संदीप बाळासाहेब राऊत, रा. संध्यामठ गल्ली शिवाजीपेठ कोल्हापूर, ५ ) प्रकाश नागनाथ गाडीवडर रा. क्रेशर चौक सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर, ६) दिलीप जगन्नाथ अधिकारी, रा. संभाजीनगर जुनि मोरे कॉलनी, ७)आनंदा श्रीपती दुकांडे रा. वेताळमाळ तालमीजवळ शिवाजीपेठ कोल्हापूर, ८) चैतन्य विलास बंडगर, रा. क्रेशर चौक झोपडपटटी कोल्हापूर, ९) विष्णु पांडुरंग आंग्रे, काटे भोगाव ता. पन्हाळा, १०) निरंजन वसंत ढोबळे, रा.मंगळवारपेठ कोल्हापूर, ११ ) कुलदिप बाजीराव लांबोरे रा. मंगळवारपेठ कोल्हापूर ,१२)नंदकुमार पंडीतराव चोडणकर रा गंगावेश कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी व त्यांचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुन: प्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक जुनाराजवाडा पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचेकडे सादर केलेला होता.
सदर प्रस्तावाची निःपक्षपातीपणे चौकशी ही उप विभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग यांनी करुन, त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी मा. हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी देण्यात आला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये टोळी प्रमुख विजय लहु पाटील याने निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन अवैध व्यवसायाला परिणाम दिलेला असल्याने, टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे तरुण वर्ग वाममार्गाला लागलेला आहे. टोळीच्या या कृत्यामुळे समाजामध्ये गुन्हेगारीला उत्तेजन मिळत आहे. त्यामुळे सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण झालेली असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

 

सध्या सुरु असलेली लोकसभा निवडणुक प्रक्रिया तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था व सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सारे यांनी दिनांक ०८/०४/२०२४ रोजी वर नमुद मटका किंग गँग” या टोळीचे प्रमुखासह १२ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एक वर्षाचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केलेले आहेत. जुना राजवाडा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी सदर आदेशाची अमलबजावणी केली आहे.
 

हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास, त्यानी पोलीस ठाणेस फोन न. ०२३०-२४२२२०० अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे अवाहन  महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी नागरीकांना केले आहे.


मटका किंग विजय पाटील सह “मटकाकिंग गँगचे” 12 जण जिल्ह्यातून हद्दपार- एक वर्षासाठी जिल्हा पोलिस दलाची कारवाई