बातम्या

एसटीच्या 122 फेऱ्या रद्द प्रवाशांचे हाल....

122 trips of ST canceled plight of passengers


By nisha patil - 11/24/2023 5:13:04 PM
Share This News:



ऊसाला तीन हजार पाचशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे बेंगलोर महामार्ग आठ तास रोखून धरल्यामुळे याचा एसटी महामंडळाला फटका बसला बंदोबस्तासाठी तब्बल 500 पोलीस रस्त्यावर होते तरीसुद्धा प्रवाशांचे हाल झाले दिवसभर महामार्गावर तणाव होता तसेच अनेक मार्ग वळवून बसेस तर हलवल्या मात्र प्रवाशांचे हाल झालेचे चित्र दिसले पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असली तरी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले काही जणांनी उतरून चालत कोल्हापुरात येणे पसंत केले.  दिवसभरात मुंबई पुणे सातारा सांगली इचलकरंजी सोलापूर पंढरपूर आदि मार्गावरील 122 फेऱ्या रद्द झाल्या होत्या त्यामुळे एसटी प्रशासनाला पाच लाख 62 हजार 407 रुपयाचा तोटा सहन करावा लागला आगारामध्ये बसेस तर होत्या परंतु फेऱ्या रद्द होत्या कमी प्रमाणात बसेस तसेच वेगळ्या मार्गावरून बसेस जात होत्या मात्र प्रवाशांची गर्दीच गर्दी आणि गैरसोयसुद्धा झाल्याची दिसली


एसटीच्या 122 फेऱ्या रद्द प्रवाशांचे हाल....