बातम्या

विवेकानंद कॉलेजमध्ये 12 वी बोर्ड परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

12th Board Exam meritorious students felicitated at Vivekananda College


By nisha patil - 5/21/2024 7:42:13 PM
Share This News:



कोल्हापूर दि. 21 :  विवेकानंद कॉलेज गेली अनेक वर्षे बोर्ड परीक्षा निकालात कोल्हापूर विभागात अव्वल राहिले आहे. गुणवंत विद्यार्थी, तज्ञ  प्राध्यापक आणि विवेकानंद पॅटर्न यांच्या तिहेरी परिश्रमातून दरवर्षी बोर्ड परीक्षेत कला,वाणिज्य्‍ विज्ञान शाखेत  अव्वल स्थानी विवेकानंद कॉलेज राहिले  आहे. याचा सार्थ अभिमान आहे  असे मत  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांनी 12 वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मधील  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मांडले.  विवेकानंद कॉलेजच्या वतीने कला, वाणिज्य् व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करणेत आला होता. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ. शुभांगी गावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले.

            विज्ञान शाखेत उस्ताद अल्तमाश मुश्ताक 95.00  गुण मिळवून प्रथम आला.  माने ओम रमेश 94.83 गुणांसह व्दितीय तर कु. राम अर्चनाकुमारी दरोगा हिने 92.33 गुण मिळवून तिसरी येण्याचा मान मिळविला. 

 वाणिज्य शाखेत शेवरमनी खुशी प्रेम 95.33 गुण मिळवून प्रथम, पाटील शुभम प्रबोध  93.83 गुण मिळवून  व्दितीय आणि गोंधळी वैभवी अनिल 93.00 टक्के  गुण संपादन करुन तिसरी आली.

            कला शाखेत लवटे विवेक कृष्णात 90.83  गुण मिळवून प्रथम ,  कु. पाटील श्रावणी नंदकुमार, 88.67 गुण संपादन व्दितीय, तर कु. नदाफ नाझिया राकेश  87.67  गुण संपादन करुन तिसरी आली. 

            कला शाखेचा निकाल 86.34 ,  वाणिज्य्‍  शाखेचा 98.53 तर विज्ञान शाखेचा निकाल 99.88 इतका लागला असून सरासरी निकाल 97.63 इतका लागला आहे. 

 “विवेकानंद कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने प्रयत्न्‍ केले जातात. विदयार्थ्यांच्या  गुणवत्तेला पैलू पाडून यशस्वी हिरा बनवले जाते. अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि सातत्याचे मार्गदर्शन व योग्य्‍ अभ्यासपध्दती यामुळेच गुणवत्ता यादीत विदयार्थी आल्याचे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांनी मांडले.

स्वागत  व प्रास्ताविक प्रा..एम.ए.कुरणे  यांनी  केले.  तर आभार  प्रा. सौ यु.आर.हिरकुडे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा.विश्वंभर कुलकर्णी यांनी केले.  याप्रसंगी ज्युनिअर विभागाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


विवेकानंद कॉलेजमध्ये 12 वी बोर्ड परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार