बातम्या

12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेस्सी बनला बाबा

12th Fail fame actor Vikrant Messi became a father


By nisha patil - 9/2/2024 4:59:37 PM
Share This News:



 अभिनेता विक्रांत मेस्सीच्या 12 फेल या सिनेमाने मोठे यश मिळवले. दरम्यान विक्रांतच्या आनंदात आणखी भर पडली आहे. विक्रांत मेस्सी बाबा बनला आहे. त्याची पत्नी शितल ठाकूर याने गुडन्यूज दिली आहे. शितलने मुलाला जन्म दिलाय. अभिनेता विक्रात मेस्सीने ही खूशखबर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. 

विक्रांत मेस्सीने इन्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बाबा झालो असल्याची घोषणा केली. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शितल ठाकूर हिने मुलाला जन्म दिल्याचे स्पष्ट केले आहे. विक्रांत आणि शितलने संयुक्तपणे खुशखबर दिली आहे. खुशखबर देताना मेस्सी दाम्प्त्याने एक नोटही लिहिली आहे. या नोटमध्ये मेस्सीने लिहिले की, "आता आमच्याकडे पण एक आहे. आम्ही आमच्या मुलाचे आगमन झाले असल्याची घोषणा करत आहोत. आमचा आनंद गगनात मावत नाहीये.


12th Fail फेम अभिनेता विक्रांत मेस्सी बनला बाबा