बातम्या

12 वी फेल’ ठरला सर्वोत्कृष्ठ चित्रपट

12th Fail was the best film


By nisha patil - 1/29/2024 5:12:20 PM
Share This News:



बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय पुरस्कार सोहळा फिल्मफेयर अवॉर्ड्स यंदा गुजरातमधील गांधीनगरमध्ये येथे रंगला. करण जोहर, आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

दरवर्षी वेगवेगळ्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीत खऱ्या उतरणाऱ्या चित्रपटांचा आणि अभिनेत्यांचा ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’मध्ये सन्मान केला जातो. यंदाच्या 2024 च्या या फिल्मफेयर अवॉर्ड्  सोहळ्यात आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूर  सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. तर ’12 वी फेल’ (12th Fail) हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ आणि विक्रांत मैसीच्या ’12वीं फेल’ या दोन्ही चित्रपटांना प्रत्येकी 5 पुरस्कार मिळाले.


12 वी फेल’ ठरला सर्वोत्कृष्ठ चित्रपट