बातम्या
शेअर मार्केटमधून ज्यादा परताव्याच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक
By nisha patil - 8/8/2023 12:41:36 PM
Share This News:
शेअर मार्केटमधून ज्यादा परताव्याच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक
शेअर मार्केट मधून ज्यादा परताव्याचे अमिश दाखवून इचलकरंजीमधील चौघाजणांची सुमारे १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागल इथं राहणारा किशोर आळतेकर आणि इचलकरंजीतील स्वप्नील स्वामी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या दोघांनी इचलकरंजी येथील प्रकाश केस्ती प्रकाश ऐतवडे अजय पवार संजय शिंदे यांची हि फसवणूक केली आहे
काही दिवसापूर्वी शेअर मार्केटमध्ये जादा पैशा करून देण्याचे अमिष दाखवून किशोर आळतेकर व स्वप्निल स्वामी यांनी त्यांच्याकडून साडेसहा लाख रुपये घेतले होते पण त्यांनी पैसे परत दिले नाही अन्य अशा चौघांनी मिळून या दोघांकडे तेरा लाख रुपयाची गुंतवणूक केली होती पैसेचा परतावा देत नसल्यामुळे आज प्रकाश केस्ती यांनी या दोघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे यामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले आहे शहरांमध्ये जादा पैश्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणारी टीम सध्या कार्यरत झाली आहे त्यामुळे नागरिक अशा आमिषाला बळी पडून आपल्या मौल्यवान वस्तू विकून यामध्ये पैश्याची गुंतवणूक केली जात आहे त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समजतात हे गुंतवणूक करणारे अडचणी येतात
शेअर मार्केटमधून ज्यादा परताव्याच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक
|