बातम्या

नेहरू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला आमदार फंडातून १४ संगणक प्रदान

14 computers provided to Nehru High School and Junior College from MLA Fund


By nisha patil - 5/26/2023 5:13:42 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  कोल्हापुरातील दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचलित नेहरू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून 14 संगणक प्रदान करण्यात आले. विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते आणि आमदार जयंत आजगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे 14 संगणक आज संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर प्रशासक कादर मलबारी यांच्याकडे  करण्यात आले.
यावेळी नेहरू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मधील कला आणि विज्ञान शाखेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर मार्गदर्शक शिक्षकांचे सत्कार आमदार सतेज पाटील आणि जयंत आजगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार आहूजा रफिक मुल्ला हाजी जहांगीर नदाफ रफिक शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नेहरू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजला आमदार फंडातून १४ संगणक प्रदान speednewslive24#