बातम्या

क्रशर चौकात 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

14 lakh 28 thousand rupees worth of Goan liquor seized in Crusher Chowk


By nisha patil - 11/11/2024 12:59:04 PM
Share This News:



क्रशर चौकात 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक क्रमांक 1 कडून  गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी प्रसाद महादेव नराम मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग आरोपीस अटक केलीय त्यांच्याकडून वाहनासह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
 

यातील निव्वळ मद्याची किंमत 9 लाख 78 हजार 600 रुपये असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी दिलीय 

    कोल्हापूर राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाच्या  भरारी पथकाला राधानगरी - कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चोक, इरानी खान रंकाळा तलाव जवळ, कोल्हापूर शहर येथे सापळा लावून पाळत ठेवली. काल सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा जेनिओ घेऊन येत होता. त्या वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्यात विक्रीस परवानगी असलेले व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य व बिअर ने भरलेले कागदी पुठ्याचे विविध बँडचे 180, 500 तसेच 750 मिलीचे एकुण 151 बॉक्स आढळून आले.

 गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आरोपी व्यतिरीक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का? तसेच या मद्याचा कोठे पुरवठा करणार होता? याबाबतचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान विलास पवार, विशाल भोई, सचिन लोंढे, धीरज पांढरे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे हे करत आहेत.


क्रशर चौकात 14 लाख 28 हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
Total Views: 12