बातम्या

शिवजयंती निमित्त पन्हाळगडावरून १४०० शिवज्योती रवाना

1400 Shiv Jyoti left from Panhalgad on the occasion of Shiv Jayanti


By nisha patil - 2/19/2025 7:26:29 PM
Share This News:



शिवजयंती निमित्त पन्हाळगडावरून १४०० शिवज्योती रवाना

पन्हाळा (प्रतिनिधी) महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते शिवजयंतीला अनेक गड किल्ल्यावरून शिवज्योत नेली जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यानिमित्त महाराष्ट्रामध्ये एकमेव असणाऱ्या पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जन्मकाळ सोहळ्यासह इतर कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातून शिव ज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी  मंगळवारी रात्रभर पन्हाळगडावर महाराष्ट्र कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती शिवभक्त पारंपरिक वाद्यांसह भगव्या टोप्या फेटे झेंडे यांनी संपूर्ण पन्हाळगड  शिवमय झाला होता आणि जय शिवाजी जय भवानी च्या जय घोषाने पन्हाळगड दुमदुमून गेला रात्रभर शिवज्योत देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात रिघ लागली होती. रात्री ते सकाळ पर्यंत जवळपास १४०० शिवज्योत पन्हाळगडावरून रवाना झाल्या.आज सकाळी जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण पन्हाळगड दुमदुमून गेला. दहा वाजता जन्मकाळ सोहळा झाल्यानंतर महिलांनी पाळणा गीत सादर केले.

यावेळी पन्हाळा शिव मंदिर व्यवस्थापक संचित भाडेकर, हनीफ नगरजी, दगडू अतिग्रे, यांनी आपली सेवा बजावली  तसेच गर्दीच्या प्रसंगी शरीफ नगरजी ,अतिश अतिग्रे, वैभव कोळी, सत्यजित गायकवाड ,यांनी मोलाचे सहकार्य केले


शिवजयंती निमित्त पन्हाळगडावरून १४०० शिवज्योती रवाना
Total Views: 35