बातम्या
१८ वर्षांत १४७ नेत्यांची ईडीकडून चौकशी; यामध्ये ८५ टक्के नेते हे विरोधक
By nisha patil - 11/2/2024 9:37:07 PM
Share This News:
१८ वर्षांत १४७ नेत्यांची ईडीकडून चौकशी; यामध्ये ८५ टक्के नेते हे विरोधक
मुंबई – सध्या देशात ईडी, सीबीआय यासारख्या कारवाईनं भाजपकडुन विरोधकांना लक्ष केलं जातंय. भाजप सत्तेचा गैरवापर करतंय. भाजपच्या आठ वर्षाच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु, ईडीनं कारवाई केलेल्यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नाही. अशी माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे. २०१४ ते २०२३ या काळात ईडीकडून एकूण सहा हजार केसेस नोंदवण्यात आल्या. त्यापैकी केवळ २५ प्रकरणांमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलं. या २५ पैकी फक्त दोघांना शिक्षा झालीय. गेल्या १८ वर्षांमध्ये १४७ नेत्यांची चौकशी झाली. यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत. ईडीच्या या सगळया कामासाठी जवळपास ४०४ कोटी रुपये खर्च झालेत, असंही पवार यांनी सांगितलं.
१८ वर्षांत १४७ नेत्यांची ईडीकडून चौकशी; यामध्ये ८५ टक्के नेते हे विरोधक
|