भाजपाविरोधातले १५ पक्ष एकत्र येणार
By nisha patil - 6/23/2023 4:24:50 PM
Share This News:
बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. भाजपाविरोधातले १५ पक्ष या बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत देखील पाटण्यात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या बैठकीआधी शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.
भाजपाविरोधातले १५ पक्ष एकत्र येणार
|