बातम्या

बुधवार पेठेतील हिंदकेसरी हरण्याने १७ लाख जिंकले

17 lakh won by losing Hindkesari in Peth on Wednesday


By nisha patil - 3/14/2024 3:30:39 PM
Share This News:



बुधवार पेठेतील हिंदकेसरी हरण्याने १७  लाख जिंकले

बैलगाडी शर्यती आयोजनाचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश हुक्केरी यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त आंतरराज्य पातळीवरील भव्यविना लाटीकाटी बैलगाडी शर्यती पार पडल्या जवळजवळ दहा ते बारा वर्षांपूर्वीचा तोच रुबाब तेच मैदान तशीच लाखांची बक्षिसे हजारो शर्यती शौकिनांचा जनसागर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा तसेच ऐतिहासिक 64 लाख रुपयांच्या बैलगाडी शर्यतीचा थरार पुन्हा एकदा पहावयास मिळाला संदीप पाटील कोल्हापूर यांचा हिंदकेसरी हरण्या प्रथम बक्षीस असलेल्या 17 लाखाचा मानकरी ठरला असून काही मिनिटाच्या फरकाने या पट्ट्याने सावकार शर्यतीचे मैदान गाजवले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठी बैलगाडी शर्यत म्हणून एकसंबा गावाच्या शर्यती ठरली माजी मंत्री कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसाचे औचित साधून मलिकवाड माळावर भव्य शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले होते एकूण तीन विभागात बैलगाडी शर्यत होत्या यामध्ये अश्रेनीसाठी एकूण 33 लाख व ब श्रेणीसाठी 18 लाख तर श्रेणीसाठी एकूण 13 लाख अशा एकूण 64 लाख रुपयांची बक्षिसे आयोजित केली होती. प्रारंभी आमदार प्रकाश हुक्केरीआमदार गणेश हुक्केरी व मान्यवरांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतींना सुरुवात झाली

17 लाख रुपयांचे मैदान पाहण्यासाठी आलेल्या शर्यती शौकिनांचे हिंदकेसरी हरण्याने अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडले श्रेणीतील बैलगाडी शर्यती प्रथम क्रमांक पटकावून एकसंबाच्या सावकार शर्यती मैदानावर आपले सोनेरी नाव कोरले संदीप पाटील कोल्हापूर प्रथम क्रमांक हरण्याने नाव घेताच उपस्थित आणि टाळ्यांच्या कडकडाटा त्याचे अभिनंदन केले मान्यवरांच्या हस्ते जल्लोषी वातावरणात त्यांना 17 लाख रुपयाचा धनादेश व शील्ड व निशाणी देऊन गौरविण्यात आले


बुधवार पेठेतील हिंदकेसरी हरण्याने १७ लाख जिंकले