बातम्या
ग्रामसडक योजनेतून दक्षिणमध्ये १८ कोटींचा निधी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांना यश
By nisha patil - 5/10/2024 6:14:29 AM
Share This News:
कोल्हापूर : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ५ रस्त्यांसाठी १८ कोटी ९५ लाख ७३ हजार रुपयांच्या निधीला शुक्रवारी प्रशासकीय मंजुरी मिळाली. यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्ते दर्जेदार होण्यास मदत होणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला होता. त्यांना काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला असून ही कामे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करायची आहेत.या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ८९ लाख रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली.
या रस्त्यांच्या निधीला मिळाली मंजुरी
-खडीचा गणपती ते माेरेवाडी-चित्रनगरी रस्ता -निधी -५ कोटी ५४ लाख ४१ हजार,
-शिवाजी विद्यापीठ-सरनोबतवाडी-राष्ट्रीय महामार्ग-३ कोटी ९२ लाख २६ हजार,
-सुर्वेनगर कळंबेतर्फे ठाणे -३ कोटी ५८ लाख ७३ हजार रुपये,
-गोकुळ शिरगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग -४ कोटी ६७ लाख ७३ हजार,
-गोकुळ शिरगाव ते केआयटी कॉलेज रस्ता -२ कोटी २२ लाख ६० हजार रुपये
ग्रामसडक योजनेतून दक्षिणमध्ये १८ कोटींचा निधी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांना यश
|