शैक्षणिक
१८८ विद्यार्थी सौ. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड ने सन्मानित
By nisha patil - 1/17/2025 2:18:46 PM
Share This News:
१८८ विद्यार्थी सौ. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड ने सन्मानित
डी वाय पाटील एज्युकेशन ग्रुप मध्ये शैक्षणिक वर्षांत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १८८ विद्यार्थ्याना सौ. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आलं.कोल्हापुरात आज हा समारंभ संपन्न झाला.
गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात हातभार म्हणून २०२२ सालापासून डॉ.डी वाय पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन कोल्हापूरच्या माध्यमातून मेरिट स्कॉलरशिप सुरू करण्यात आलीय.सौ. शांतादेवी डी पाटील ( आईसाहेब ) यांच्या नावे ही स्कॉलाशिप सुरू करण्यात आलीय.सन २०२२ - २३ या शैक्षणिक वर्षात ६६ गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आलं होतं.
सन २०२३ - २४ साली १३६ विद्यार्थ्याना सन्मानित करण्यात आलं होत.तर आज या शिष्यवृत्तीच्या तिसऱ्या वर्षी तब्बल १८८ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आलंय.कोल्हापुरातील हॉटेल सयाजी व्हिक्टोरिया सभागृहात हा समारंभ संपन्न झाला.यावेळी आईसाहेब सौ. शांतादेवी पाटील,डी वाय पाटील एज्युकेशन ग्रुपचे ट्रस्टी संजय डी पाटील,ऋतुराज पाटील,पृथ्वीराज पाटील,पूजा पाटील,वृषाली पाटील, देवश्री पाटील,तेजस पाटील ,यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आलं.
दरम्यान या समारंभा प्रसंगी बोलताना ट्रस्टी डॉ.संजय डी पाटील यांनी आईसाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.मुलांनी अभ्यास करून नाव कमवावं.डी वाय पाटील ग्रुप नेहमी पाठीशी राहीन,येणाऱ्या काळात अनेक चांगल्या सुविधा देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.ऋतुराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं.
दरम्यान आईसाहेब शांतादेवी पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.विविध मान्यवर शिक्षक विद्यार्थी पालकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.या अवॉर्ड सोहळ्याप्रसंगी मान्य वरांसह, डॉ.डी वाय पाटील एज्युकेशन संस्थांचे प्राध्यापक ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते
१८८ विद्यार्थी सौ. शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड ने सन्मानित
|