बातम्या
19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
By nisha patil - 5/21/2024 7:40:12 PM
Share This News:
कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित 19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या स्वराज ढमढेरे, नील केळकर, पश्चिम बंगालच्या संकल्प सहानी, शौनक चॅटर्जी, कर्नाटकच्या निकित कोरीशेत्रु, आंध्रप्रदेशच्या लक्ष्य चुक्का यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत महाराष्ट्राच्या स्वराज ढमढेरेने सहाव्या मानांकित अहान शेट्टीचा टायब्रेकमध्ये 6-7(5), 6-3, 6-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या नील केळकर याने तामिळनाडूच्या अकराव्या मानांकित प्रत्युश लोगनाथनचा 3-6, 7-6(3), 6-1 असा तर, पश्चिम बंगालच्या शौनक चॅटर्जीने मध्यप्रदेशच्या नवव्या मानांकित रुद्र बाथमचा 7-5, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या आंध्रप्रदेशच्या लक्ष्य चुक्काने महाराष्ट्राच्या सोळाव्या मानांकित सार्थक गायकवाडचा 1-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. पश्चिम बंगालच्या संकल्प सहानीने हरियाणाच्या चौदाव्या मानांकित त्रिशुभ कुमारचा 6-2, 6-2 असा पराभव केला. कर्नाटकच्या निकित कोरीशेत्रुने महाराष्ट्राच्या तेराव्या मानांकित मनन अगरवालचे आव्हान 6-3, 7-6(1) असे मोडीत काढले.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: 16 वर्षाखालील मुले:
प्रतीक शेरॉन(हरियाणा)(1)वि.वि.फजल अली मीर(तामिळनाडू) 7-5, 6-3;
नीव गोगिया(महा)वि.वि.लक्ष्य धीमान(हरियाणा) 6-4, 4-6, 6-4;
आराध्य म्हसदे (महा)वि.वि.महिजित प्रधान(महा) 7-5, 7-5;
लक्ष्य चुक्का(आंध्रप्रदेश)वि.वि.सार्थक गायकवाड(महा)(16)1-6, 6-3, 6-4;
नील केळकर(महा)वि.वि.प्रत्युश लोगनाथन(तामिळनाडू)(11)3-6, 7-6(3), 6-1;
प्रद्न्येश शेळके (महा)वि.वि.अमृत वत्स (पश्चिम बंगाल) 6-1, 6-2;
स्वराज ढमढेरे(महा)वि.वि.अहान शेट्टी(6)6-7(5), 6-3, 6-0;
हृतिक कटकम(तेलंगणा)(3)वि.वि.यश पटेल(गुजरात) 6-2, 6-0;
ध्रुव सेहगल(महा)वि.वि.ऋत्विक दत्त(उत्तरप्रदेश) 6-4, 6-3;
मनन राय (महा)वि.वि.कबीर जेटली (महा) 6-2, 6-2;
संकल्प सहानी(पश्चिम बंगाल)वि.वि.त्रिशुभ कुमार(हरियाणा)(14)6-2, 6-2;
शौनक चॅटर्जी (पश्चिम बंगाल)वि.वि.रुद्र बाथम (मध्यप्रदेश) (9)7-5, 6-2;
शरण सोमासी(कर्नाटक)वि.वि.अर्णव हरिशंकर(तामिळनाडू) 6-3, 7-5;
सक्षम भन्साळी (महा)वि.वि.गौरीश मदन (चंदीगढ) 6-4, 6-0;
कनिष्क खथुरिया(मध्यप्रदेश)(7)वि.वि.नितिक शिवकुमार(तामिळनाडू) 1-6, 7-5, 6-4;
निकित कोरीशेत्रु(कर्नाटक)वि.वि.मनन अगरवाल(महा)(13)6-3, 7-6(1);
शार्दुल खवले (महा)वि.वि. रोहन बजाज (महा) 6-3, 6-3;
नीव कोठारी (महा)वि.वि.क्रिशांक जोशी 6-2, 6-3;
विश्वजीत सणस(महा)(१२)वि.वि.मोक्षक चल्ला(तेलंगणा) 6-2, 6-1.
19व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षाखालील राष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
|