बातम्या
कोल्हापूरातून २ हजार आशा, गटप्रवर्तक मुख्यमंत्री निवासस्थानी जाणार...
By nisha patil - 7/2/2024 11:32:27 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर - आशा आणि गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांचा शासन निर्णय त्वरित काढा असं साकडं घालण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून २ हजार आशा आणि गटप्रवर्तक मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सीटूचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे आणि जिल्हासचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी पत्रकार बैठकीत दिलीय.
जोपर्यंत शासनं निर्णय काढला जात नाही तोपर्यंत ठाणे सोडणार नाही असा पवित्रा आशा आणि गटप्रवर्तकांनी घेतलाय. जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक उद्या (गुरुवार) रेल्वेनं ठाण्याकडं रवाना होणार होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
कोल्हापूरातून २ हजार आशा, गटप्रवर्तक मुख्यमंत्री निवासस्थानी जाणार...
|