बातम्या
घरफाळा सवलत योजनेच्या शेवटच्या दिवशी 2 कोटी 10 लाख जमा
By nisha patil - 2/16/2024 1:12:37 PM
Share This News:
घरफाळा विभागाच्या 50 टक्के सवलत योजनेमधून आजअखेर 10 कोटी 50 लाख रककम वसूल झाली आहे. गुरुवारी 50 टक्के सवलत येाजनेच्या शेवटच्या दिवशी 2 कोटी 10 लाख रक्कम जमा झाली आहे.
महापालिकेच्यावतीने दि. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस दंडव्याजामध्ये 50 टक्के सवलत योजना केली होती. या योजनेस शहरातील मिळकतधारकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
या योजनेमध्ये शहरातील आजअखेर 7413 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेला 10 कोटी 50 लाख इतका घरफाळा वसूल झाला आहे. तर दि.1 एप्रिल 2023 ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर रुपये 58 कोटी 37 लाख 20 हजार 514 इतका मालमत्ता कर भरणा केला आहे. शुक्रवार, दि.16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 30 टक्के सवलत मिळणार आहे.
तरी 30 टक्के योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी चालू बिलासह थकीत रक्कम एकरकमी रोख, धनादेश, डिमांड ड्राफटव्दारे, ऑनलाईन सिस्टीमव्दारे (फोन पे,गुगल पे,मोबाईल वॉलेटव्दारे) भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
घरफाळा सवलत योजनेच्या शेवटच्या दिवशी 2 कोटी 10 लाख जमा
|