बातम्या

लक्ष्मीपुरी पोलीसांच्या हाकेच्या अंतरावर २ लाखांची चोरी

2 lakh theft within the call distance of Laxmipuri police


By nisha patil - 12/16/2023 5:12:43 PM
Share This News:



लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील दोन धान्य दुकानांच्या छताचा पत्रा उचकटून  दुकानात प्रवेश करत अज्ञातनी  सुमारे दोन लाख रुपयांची लवकर लंपास केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही  घटना घडली आहे लक्ष्मीपुरी धान्य लाईन इथ महादेव चिवटे आणि निळकंठ सावर्डेकर यांची धान्य विक्रीची होलसेल दुकाने आहेत.

 शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातनी चिवटे   यांच्या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने दुकानातील तिजोरी चा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले. त्यांनी या दुकानातील बाजूला असेल्या  एका ड्रॉवर मधील 25000 ची रक्कम लंपास केली यानंतर चोरत्यांनी चिवटे  यांच्या दुकानातूनच पत्रा उचकटून निळकंठ सावर्डेकर यांच्या दुकानात प्रवेश केला. सावर्डेकर यांच्या दुकानातील लोकरचे कुलूप तोडून सुमारे दीड लाख रुपयांची रोकड लंपास केलीय. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिवटे आणि  सावर्डेकर यांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या चोरट्याने या परिसरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरा च्या वायर चोरी करण्यापूर्वी कट केले आहेत त्यामुळे हा चोरटा सराईत आणि माहितगार असावा असा प्राथमिक अंदाज आहे.


लक्ष्मीपुरी पोलीसांच्या हाकेच्या अंतरावर २ लाखांची चोरी