भीमा कृषी पशू प्रदर्शनात २० कोटींची उलाढाल

20 crore turnover in Bhima Agricultural Livestock Exhibition


By nisha patil - 2/25/2025 12:33:43 PM
Share This News:



भीमा कृषी पशू प्रदर्शनात २० कोटींची उलाढाल

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२५  २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ ला मेरी वेदर मैदान येथे पार पडले. प्रदर्शनाला कर्नाटक गोवा सांगली सातारा बेळगाव कोकण या सह कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शहरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. चार दिवसांमध्ये जवळजवळ ५ लाख शेतकऱ्यांसह लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.सतरा वर्ष आयोजित करण्यात येत असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे प्रदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या

भीमा कृषी प्रदर्शन २०२५ मध्ये गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो. तर सांगोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल नामदेव पवार यांचा खिलार खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द  शो. तर हरियाणा पानिपत येथील पद्मश्री नरेंद्र सिंह, रणधीर सिंह यांचा विधायक रेडा ठरला आहे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरला.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून २० कोटींच्या आसपास उलाढाल चार दिवसांमध्ये झाली आहे. तर बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून एक कोटी रुपये  उलाढाल झालेली आहे.

सुजित चव्हाण हाऊस ऑफ इव्हेंट यांनी कृषी प्रदर्शन २०२५ चे  उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केले होते.या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी, डॉ.एन.डी पाटील, डॉ.सचिन पाटील,श्री.विलास इंगवले,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,दिलीप दळवी, डॉ.आनंदा पोवार,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदींनी अथक परिश्रम घेतले या सर्वांचा सन्मान सांगता समारंभात करण्यात आला.


भीमा कृषी पशू प्रदर्शनात २० कोटींची उलाढाल
Total Views: 33