बातम्या

बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू, भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत : चीनमध्ये महापूर

20 dead in Beijing life disrupted due to severe flooding


By nisha patil - 2/8/2023 8:30:22 PM
Share This News:



राजधानी बीजिंगमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. चीनमध्ये 140 वर्षांनंतर चीनमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे  20 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर  52,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.चीनमधील अनेक शहरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे राजधानी बीजिंगसह अनेक मोठी शहरे पाण्याखाली गेली आहेत. 140 वर्षांपूर्वीही चीनने अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना केला होता. त्यानंतर आता 140 वर्षांनंतर चीनवर ही भीषण नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.बीजिंगमध्ये मुसळधार पावसामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे, गेली चार  दिवस

मुसळधार पाऊस चौथ
 कोसळत आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत आणखी 27 लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. डोक्सुरी वादळामुळे उत्तर चीनमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून भीषण पूर आला आहे. बीजिंग हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 744.8 मिमी पावसामुळे वांगजियायुआन जलाशय भरलं आहे. पावसामुळे आतापर्यंत 20 जणांना जीव गमवावा लागला असून 27 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू झाला असून, हेबेई प्रांतात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. चोंगकिंगमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. लिओनिंगमध्ये पूरग्रस्त भागातून सहा हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. यापूर्वी 1998 मध्ये चीनमध्ये भीषण पूर आला होता. ज्यामध्ये 4200 लोकांचा मृत्यू झाला. यांगत्झी नदीच्या पुरामुळे बहुतेकांचा मृत्यू झाला. 2021 मध्ये हेनान प्रांतात आलेल्या पुरात 300 लोकांचा मृत्यू झाला होता.


बीजिंगमध्ये 20 जणांचा मृत्यू, भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत : चीनमध्ये महापूर