बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात धावणार 200 ई- बस

200 e buses will run in Ahmednagar district


By nisha patil - 6/27/2023 4:56:34 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम : प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) साडेपाच हजार अत्याधुनिक इलेक्ट्रिक बस (ई-बस) खरेदी करणार असून, त्यातून अहमदनगर जिल्ह्याने 200 बसची मागणी नोंदविली आहे.त्यामुळे येत्या काही महिन्यांत जिल्हाभरात ई-बस धावताना दिसणार आहेत. दरम्यान, नगरमार्गे पुणे-संभाजीनगर मार्गावर दहा ई-बस सध्या धावत आहेत.
गेल्या 74 वर्षांपासून एसटी महामंडळ प्रवासी सेवेत आहे.
प्रत्येक गावखेड्यात एसटी पोहोचली; परंतु गेल्या दोन-अडीच दशकांपासून खासगी वाहतूक जोमाने सुरू झाल्यामुळे प्रवासी दुरावत चालला आहे. इंधनाचे वाढते दर महामंडळाला आर्थिक खाईत ओढू लागले. त्यामुळे एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी पहिल्यादा पुणे-अहमदनगर ई-बससेवा सुरू झाली. आता गेल्या महिनाभरापासून पुणे-छत्रपती संभाजीनगर बससेवा सुरू आहे. दररोज ई-बसच्या 28 फेर्‍या सुरू आहेत. या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
इलेक्ट्रिक बस प्रत्येक तालुक्यात सुरू करण्याचा मानस महामंडळाने व्यक्त केला. त्यानुसार 5 हजार 500 ई-बस खरेदी करून त्यांचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. अहमदनगर विभागाने जिल्ह्यासाठी दोनशे बसची मागणी महामंडळाकडे नोंदवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात चाजिर्ंग स्टेशन तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
सावेडीसह सहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन
दोनशे इलेक्ट्रिक बस जिल्ह्यात दाखल होण्याची आशा आहे. त्यासाठी बॅटरी चाजिर्ंगची व्यवस्था सुरू आहे. तारकपूर आगाराच्या वतीने सावेडी येथील बसस्थानकात चार्जिग स्टेशन सुरू केले जाणार आहे. याशिवाय कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर व श्रीगोंदा या सहा आगारांमध्ये चार्जिग स्टेशनचे काम सुरू आहे.


अहमदनगर जिल्ह्यात धावणार 200 ई- बस