विशेष बातम्या

वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध

21 candidates including Munde sisters unopposed in Vaidyanath sugar factory elections


By nisha patil - 2/6/2023 8:49:07 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक अपेक्षाप्रमाणे बिनविरोध झाली आहे. ज्यात मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे या कारखान्याची स्थापन केली होती. दरम्यान यावेळी होणाऱ्या निवडणुकीत पंकजा मुंडे  आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. त्यानुसार वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, अॅड. यशश्री मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे, नगरपालिकेचे गटनेते वाल्मिक कराड यांच्यासह 21 जणांचा बिनविरोध संचालकांमध्ये समावेश झाला आहे.
बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी 9 मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. तसेच 11 जून रोजी मतदान घेण्याचे ठरले. संचालकपदाच्या 21 जागांसाठी एकूण 50  जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. तर 1 जून रोजी म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीतून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शिल्लक राहिलेले 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 
या कारखान्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता.
त्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे भाजप खासदार प्रतीम मुंडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
तर सुरवातीपासूनच संपूर्ण निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती.
दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रिंगणात असलेल्या 16 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उरलेले 21 जण बिनविरोध निवडून आले आहेत.


वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत मुंडे भगिनींसह 21 उमेदवार बिनविरोध