बातम्या
कोल्हापुरातून गणेशोत्सवासाठी 220 ज्यादा बसेसच्या फेऱ्या
By nisha patil - 9/16/2023 7:42:16 PM
Share This News:
खास गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान पुणे, मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण, कणकवली, सांगली, इस्लामपूर, बेळगाव या मार्गांवर खास पुण्याहून तब्बल २२० जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुमारे २०० बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच पुणे येथून कोल्हापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी एकूण २२० जादा फेऱ्या असणार आहेत. ही जादा फेऱ्यांची सोय १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत असणार आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये विभागांतर्गत प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानक, इचलकरंजी बसस्थानक या महत्त्वाच्या बसस्थानकांवरून इस्लामपूर, सांगली, मिरज, निपाणी, बेळगाव, गडहिंग्लज, गारगोटी, आजरा, चंदगड या मार्गांवर प्रवासी उपलब्धतेनुसार जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.
कोल्हापुरातून गणेशोत्सवासाठी 220 ज्यादा बसेसच्या फेऱ्या
|