विशेष बातम्या

जोतिबा यात्रेकरूंसाठी २४ तास अन्नछत्राची सुविधा

24 hour food pantry facility for Jyotiba pilgrims


By nisha patil - 8/4/2025 2:56:37 PM
Share This News:



 सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचा रौप्यमहोत्सव

जोतिबा यात्रेकरूंसाठी २४ तास अन्नछत्राची सुविधा

दोन लाखांहून अधिक भक्तांसाठी अन्नछत्राची तयारी….

 २००१ साली चैत्र यात्रेदरम्यान सुरू झालेल्या सहज सेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ट्रस्टचा रौप्यमहोत्सव १० ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत जोतिबाच्या वाडी रत्नागिरी यात्रेत साजरा होणार आहे.  प्रति वर्षीप्रमाणे यंदाही गायमुख परिसरात २४ तास चालणारे अन्नछत्र  उभारण्यात आले असून, भक्तांसाठी चहा व दुपारी मठ्ठ्याची सोय असेल. दोन लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अन्नछत्राचा लाभ घेण्याची शक्यता असल्याने व्यापक तयारी करण्यात आली आहे.
 

अन्नछत्रासाठी १५,००० चौ.फुटांचा मांडव, तसेच वेगळा चहा-मठ्ठा मंडप उभारण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांसह सेवाभावी संस्थांना जेवणाचे पॅकेट्स देण्याची जबाबदारी ट्रस्टकडे असून त्याचे वितरण पोलीस दल व देवस्थान समिती करते. ही माहिती संमती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.


जोतिबा यात्रेकरूंसाठी २४ तास अन्नछत्राची सुविधा
Total Views: 35